Wednesday, 30 May 2012

||बापू पायी ठेऊ एकविध भाव||


 खूप दिवसांपासून इच्छा होती कि, जीवनात बापूंचे जे अनुभव येतच असतात, ते लिहिले पाहिजेत.

आज मी जीवनात जे काही आहे , ते केवळ बापुंमुळेच आहे. जर बापूंनी मला त्यांच्या चरणांशी खेचून घेतले नसते तर....... खरंच या तर च्या पुढे न बोललेच बर.

संकटांशी कसा मुकाबला करावा, जीवन विकास कसा घडवावा, हे तो मला त्याच्या प्रवचनातून, लेखणीतून, ग्रंथ वाचनातून, पंचशील परीक्षेतून शिकवतच असतो... पण आपण त्यातले किती घेतो व किती आचरणात आणतो हाही एक प्रश्नच असतो.....

दर गुरुवारी व उत्सवाला बापूंचे जे दर्शन होते व बापूंच्या प्रवचनातून त्यांचे मार्गदर्शन मिळत राहते, केवळ ह्या जोरावर सुद्धा जीवन किती अंतर्बाह्य बदलत असते, हा माझ्या सारखा अनुभव इथे येणारे कितीतरी बापुभक्त घेतच असतील नाही का !

                                " किंचितही मागील पुण्य नसेल | तरीही जो हे चरण वरेल |
                                         अनिरुद्ध अनिरुद्ध सदा वदेल| मार्ग पावेल सहजता || "


हे जेव्हा मी अनुभवते, तेव्हा आनंदाचे विलक्षण शहारे येतात.

किती लोक रोजच्या संकटांना वैतागून ज्योतिष, मांत्रिक- तांत्रिक करतात व उरल्या सरल्या जीवनाचे देखील वाटोळे करून घेतात, दु:ख कधी त्यांचा पिच्छा सोडत नाही व सुख कधी त्यांच्या मागे धावत नाही. अशा लोकांकडे बघितले कि मला माझ्यावर असलेल्या बापूंच्या कृपा छत्राची तीव्र जाणीव होते.

हि जाणीव मरेपर्यंत राहू दे बापुराया व तुझी कास कधीहि व कशामुळेही सुटू नये, हीच तुझ्याचारणी प्रार्थना.

                                                   " तव कृपा कवणाही दूर करेना |
                                                     जानुनी असंख्य पापे क्रोध कधी धरेना |
                                                    पदकमल वंदाया सर्व सृष्टी निघाल्या |
                                                   "अनिरुद्ध" पाहताना सर्व दृष्टी निमाल्या. || "